पोस्टाचं अजब टपाल ! गोष्ट मराठीत.
Story of Strange mail of the post! : सुट्ट्यांमध्ये मला माझ्या आजीकडे जायचं होतं, पण आई-बाबा मला आजीच्या गावी पाठवायचं नाव काढत नव्हते. शेवटी एकदा मीच न राहवून आईला विचारलं; पण तिने मान हलवली, एक सुस्कारा सोडला आणि काहीही न बोलता ती पुन्हा कामाला लागली. मग मी बाबांना जाऊन चिकटले, तर ते म्हणाले, “मे बेटा, आपल्याकडे प्रवासाएवढे पैसे नाहीयेत गं. रेल्वेने तिथपर्यंत जायचं म्हणजे ५५ डॉलर्स तरी लागतील. असं कर, पुढच्या वर्षी जा तिच्याकडे.”
Story of Strange mail of the post!
एक वर्ष ? अरे बाप रे! मी एवढे दिवस कशी काय वाट बघणार ? दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मला एक भला मोठा कोट आणि टोपीबिपी
घालून बाहेर बर्फात खेळायला पाठवलं. बाहेर पडल्यावर मी थेट अलेक्झांडरकाकांच्या दुकानात जाऊन धडकले. ते दुकानातल्या शिडीवर चढून काही तरी करत होते. मला बघून ते छान हसले आणि म्हणाले, “हॅलो, मे!”
मी न राहवून त्यांना म्हटलं, “मला काही तरी काम द्या. रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी पैसे साठवायचेत मला.”
“काम ? मला आवडलं असतं तुला काम द्यायला. पण काय करणार, इथली सगळी कामं मोठ्यांसाठीचीच आहेत.” शिडीवरून उतरता उतरता काका म्हणाले.
माझा रडकुंडीला आलेला चेहरा बघून त्यांनी मला एक टॉफी दिली. पण त्या टॉफीने माझं दुःख थोडंच कमी होणार होतं ? त्या दिवशी रात्री बाबा कामावरून घरी आले तेव्हा मामला आणखीच बिनसलेला वाटला. ते आईशी हळूहळू काही तरी बोलत होते आणि मधूनच दोघं माझ्याकडे बघत होते. मग त्या दिवशी त्यांनी मला अगदी लवकरच झोपवलं. इतकं वाईट वाटलं मला !
दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मला उठवलं तेव्हा बाहेर अजून अंधार होता. मी गोंधळलेच. बाबांची छोटी बॅग मला दरवाज्याजवळ ठेवलेली दिसली. मी विचारलं, “आपण कुठे चाल्लोय?” आई फक्त हसली आणि म्हणाली, “चल, पटापट नाश्ता करून घे.” तेवढ्यात हळूच दार वाजलं. बाबांनी दार उघडलं, तर बाहेर आमचे एक नातेवाईक लिओनार्ड उभे होते. “चल, आवर लवकर. आपल्याला लिओनार्डसोबत पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे.” बाबा त्यांची बॅग घेऊन बाहेर पडता पडता म्हणाले. एवढ्या सकाळी पोस्ट ऑफिसमध्ये कशासाठी, असं विचारायला मी तोंड उघडणार, तेवढ्यात बाबा डोळे मिचकावत मला म्हणाले, “आता काहीही विचारू नकोस ! फक्त चल.”
आईने मला मिठी मारली, मला बाय केलं आणि मी बाबांचा हात धरून बाहेर पडले. आम्ही ग्रैग्विलच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोचलो. तिथे एक वेगळाच वास भरून राहिला होता. डिंक, कॅनव्हॉस बॅग्ज आणि लाकडाची फरशी या सगळ्यांचा एकत्र झालेला वास. बाबा तोपर्यंत पोस्टमास्टरकडे जाऊन पोहोचले होते. ते म्हणत होते, “पोस्टाच्या नव्या नियमांची यादी तुम्ही वाचली का? मला असं कळलंय की आता पोस्टातून जवळजवळ ५० पौंड (२२ किलो) वजनाचं पार्सल पाठवता येऊ शकतं. पण पार्सलमधून काय काय पाठवलेलं चालतं ?
also read : Story of Lesson in Marathi
पोस्टपास्टर पार्किन्सनी बाबांकडे थोडं संशयानेच पाहिलं आणि ते म्हणाले, “जॉन, तुझ्या डोक्यात नेमकं चाल्लंय तरी काय ?”
“ही माझी मुलगी आहे, मे. मला पोस्टातून हिला पार्सल म्हणून लुइस्टनला पाठवायचंय. तुम्हाला माहिती आहे, हा लिओनार्ड पोस्टाच्या डब्यातच काम करतो. तो आमच्या या पार्सलची काळजी घेईल.” बाबा म्हणाले.
“हो हो. तुम्ही अगदी काळजी करू नका.” लिओनार्ड म्हणाला.
बाबांची ही आयडिया ऐकून मी तर हैराणच झाले होते. पार्किन्सही चांगलेच बुचकळ्यात पडलेले दिसत होते. “मेला पार्सल म्हणून पाठवायचं?” ते स्वतःशीच पुटपुटत बोलले.
“पोस्टाचे नियम बघू या. यात असं म्हटलंय की पोस्टातून पाल, किडे किंवा आणखी कोणतीही घाणेरड्या वासाची वस्तू पाठवता येणार नाही.” पार्किन्सनी चष्म्यातून माझ्याकडे रोखून पाहिलं आणि नाकाने वास घेतल्यासारखं करत मला म्हणाले. “मला वाटतं, हा नियम तर तू पास केलायस.”
“आणि मुलींचं काय? मुलींना पाठवता येतं का पार्सल म्हणून?” मी विचारलं.
“नियमांच्या पुस्तकात मुलांबद्दल काही लिहिलेलं तर नाही. पण हां, पिल्लं पाठवता येऊ शकतात.” पार्किन्स हसत हसत म्हणाले, “बघू, या पिल्लाचं आणि त्याच्या बॅगचं वजन किती आहे ?”
मी एका वजनकाट्यावर चढले. बाबांनी माझी बॅगही त्याच्यावर ठेवली. दोन्ही मिळून वजन भरलं ४८ पौंड आणि ८ सेंट.
पार्किन्स म्हणाले, “आजवरचं सगळ्यात वजनदार पिल्लू !” मग एका चार्टकडे बघत त्यांनी बाबांना सांगितलं, “मेला ग्रैग्विलहून लुइस्टनला पाठवण्याचा खर्च आहे ५३ सेंट. बरं लिओनार्ड, तुला गाडीतल्या कोंबड्यांकडेही लक्ष द्यावं लागणार असं दिसतंय!” पार्किन्स गमतीने हसत म्हणाले.
कोणी काही म्हणायच्या आधी त्यांनी माझ्या कोटावर ५३ सेंटचं तिकीट अडकवून टाकलं आणि सोबत एका चिठ्ठीवर आजीचा पत्ता लिहिला. बाबांनी मला जवळ घेतलं आणि ‘आजीला त्रास देऊ नको’ म्हणून बजावलं. बाबा गेल्यावर मी पोस्ट ऑफिसमध्ये एका पार्सलसारखी बसून राहिले. थोड्या वेळाने लिओनार्डने मला बाकी सगळ्या पार्सलबरोबर एका गाडीत घातलं आणि प्लॅटफॉर्मवर घेऊन गेला. तिथे एक भलं मोठं काळकुट्ट इंजिन एखाद्या जंगली रानडुकरासारखं फासफुस करत उभं होतं. मला एकदम थोडी भीतीच वाटू लागली.
बाकीचं सगळं सामान डब्यात चढवल्यावर लिओनार्डने मलाही उचलून आत ठेवलं आणि तो म्हणाला, “चला, गाडी सुटायची वेळ झाली.” बरोब्बर सात वाजता गाडी सुटली आणि लांबच्या आजीच्या गावाकडच्या डोंगररांगांकडे धावू लागली. किती भारी वाटत होतं सगळं ! पार्सलचा डबा एखाद्या छोट्या पोस्ट ऑफिससारखा वाटत होता. वाटेतल्या शहरांमध्ये वाटण्याची पार्सलं वेगळी काढण्याचं काम लिओनार्ड करत होता. मी शेजारी ठेवलेल्या स्टोव्हजवळ बसून राहिले. म्हणजे मला छान उबदारही वाटेल आणि लिओनार्डला मी दिसतही राहीन. लिओनार्डला वेळ मिळाला की तो मला दरवाज्याजवळ घेऊन जात होता. वा, काय मस्त दृश्यं होती बाहेर ! कधी आमची गाडी डोंगरांजवळून जात होती, तर कधी बोगद्यात घुसत होती. लोखंडी पायांवर उभ्या असलेल्या पुलावरून आम्ही किती तरी खोल दऱ्या पार केल्या.
also read : Story of Lesson in Marathi
खूप वेळानंतर लेपवाय नावाच्या दरीत डोंगराला वळसे घालत गाडी नागमोडी धावू लागली तेव्हा माझ्या पोटात काही तरी गडबड सुरू झाली. आता उलटी होते की काय असं वाटलं. बाहेरची हवा खाण्यासाठी मी दरवाज्याकडे पळणार तितक्यात एक चिडका आवाज कानावर पडला.
“लिओनार्ड, या पोरीला म्हणावं, तिकीट दाखव नाही तर पैसे काढ.” ते हॅरी मॉरिस होते. तिकीटचेकर.
लिओनार्ड म्हणाला, “मॉरिससाहेब, ही मुलगी पॅसेंजर नाही, पार्सल आहे ! बघा, हिच्या कोटावरची चिठ्ठी वाचा.” हे ऐकून मॉरिस जोरजोरात हसू लागले आणि निघूनही गेले.
मॉरिसच्या रागावलेल्या आवाजामुळे सुरू झालेली माझ्या पोटातली गडबड आपोआपच बरी झाली होती. मला आता मस्तपैकी भूकही लागली होती. पण लिओनार्ड म्हणाले, “आता खायचं एकदम आजीच्याच घरी.” स्वीट वॉटर आणि जोसेफ अशा दोन-तीन स्टेशनवर थांबत ट्रेन लुइस्टनला पोहोचली. हे शेवटचं स्टेशन होतं. थोड्या वेळाने लिओनार्डने माझा हात हातात घेतला आणि माझं पार्सल पोचवायला तो बाहेर पडला.
आजी दिसल्यावर मी लिओनार्डचा हात सोडून पळतच सुटले. आई-बाबांनी मला दिलेला शब्द पाळला आणि त्यांना मदत केली अमेरिकेच्या पोस्ट खात्याने !
Leave a Comment