Story of Same Breakfast Again!

Story of Same Breakfast Again! in Marathi : पुन्हा तोच नाश्ता! गोष्ट.

1 min read

Story of Same Breakfast Again! : खूप दिवसांनी थोडी फुरसत मिळाली होती. पाऊसदेखील मस्त पडत होता. म्हणून मग आम्ही दोन दिवस फिरायला जाऊन यायचं ठरवलं. माझी नात अनिका, तिचे आई-बाबा आणि मी.

आमच्या जुन्या ओळखीचे म्हात्रेकाका जवळच्या गावात राहत होते. त्यांनी हल्लीच घराची नव्याने बांधणी केली होती आणि आपल्या वाडीत काही खोल्या बांधून घेतल्या होत्या – निसर्ग पर्यटनासाठी म्हणून. गावच्या वातावरणात हौसेने चार दिवस घालवायला खूपजण तिथे यायला लागले होते. म्हात्रेकाकादेखील किती तरी दिवस आम्हाला त्यांच्याकडे बोलावत होते. तेव्हा सगळं काही चांगलं जुळून आलं होतं.

शनिवार सकाळ होती. पावसाळी हवेत छान गारवा होता. रस्त्यावर फारसं ट्रॅफिकही नव्हतं. त्यामुळे आमचा प्रवास मस्त झाला. सोबत अनिकाची नेहमीची बडबड- ‘आज्जी हे बघ, आई ते बघ’ अशी ! वळणदार आणि मध्ये छोटे घाट असलेल्या रस्त्यावर प्रवास मस्त मजेत पार पडला.

वाडीच्या बाहेर म्हात्रेकाका वाटच बघत होते. त्यांनी लगेच आमचं तोंडभरून स्वागत केलं आणि आम्हाला परिसर पूर्ण फिरून दाखवला. खूप हिरवंगार होतं सगळीकडे. पावसाळ्यामुळे तर हिरव्या रंगाच्या किती तरी छटा दिसत होत्या. त्यात दडलेल्या छोट्या छोट्या बैठ्या खोल्या. त्यांना बाहेर ऐसपैस व्हरांडा. वरची तांबडी कौलं त्या हिरव्या रंगात अगदी उठून दिसत होती.

Story of Same Breakfast Again! in Marathi

अनिकाचं निरीक्षण चालूच होतं. वेगवेगळ्या प्रकारचे मोठे डेरेदार वृक्ष. त्यांना लटकत्या वेली, चिकू-आंब्याची बुटकी झाडं. नारळाची उंच सरळसोट झाडं. झालंच तर रंगीबेरंगी फुलांची झुडुपं आणि चोहीकडे डोळ्यांना सुखावणारी हिरवळ.

“आज्जी, किती मस्त वाटतं ना या हिरवळीवरून चालताना?” खूप नवल वाटत होतं अनिकाला. नाही म्हटलं तरी ती शहरी मुलगी !

ही मजा करताना मध्येच अनिकाला आठवण

झाली ती पोटोबाची.

“काका, नाश्ता काय आहे?”

म्हात्रेकाकांना सुरसुरी आली.

“आम्ही काय करतो माहीताय का, दर दिवशी ब्रेड-बटर देतो. कॉर्नफ्लेक्स-दूध पण ठेवतो कोणाला तशी आवड असेल तर. आणि घरची केळी. त्याशिवाय नाश्त्याला खास तीन पदार्थ देतो. दर महिन्याच्या एक तारखेपासून आम्ही सुरुवात करतो. पहिला पदार्थ आहे सँडविच, एक तारखेला चीज सँडविच, दुसऱ्या दिवशी व्हेज सँडविच, असं ते आलटून-पालटून देतो.”

Also Read : Story of There was a king and… in Marathi

“अरे वा, मस्तच की काका!”

“दुसरा पदार्थ असतो खास मराठमोळा. एक तारखेला सुरुवात करतो पोह्यांनी. मग पुढच्या दिवशी बटाटेवडा आणि नंतरच्या दिवशी थालीपीठ. असं ते दर तीन दिवसांनी रिपीट होत राहतं.”

“ग्रेट आयडिया!” अनिका बाबांना टाळी देत म्हणाली.

“आणि ऐक की… तिसरा पदार्थ असतो उ पद्धतीचा. एक तारखेला इडली, दोन तारखेला डोस तीन तारखेला मेदूवडा आणि चार तारखेला उपभा. तर सांग बघू आजचे पदार्थ काय आहेत ते?”

“आज वीस जुलै आहे..” मनाशी आकडेमोड करत अनिका म्हणाली, “सम दिवस म्हणजे व्हेर सँडविच, तीनने भाग जाऊन दोन उरतात म्हणून बटाटेवडा आणि चारने पूर्ण भाग जातो म्हणजे उपमा ! मला खूप आवडतो उपमा, आणि बटाटेवडा पण!” “

बरोब्बर!” म्हात्रेकाकांनी अनिकाला खूप मनापासून शाबासकी दिली. “आणि सांग, की एक तारखेचे पदार्थ जसेच्या तसे त्या महिन्यात परत कधी येतील?”

“काका, तुमच्या पदार्थांमध्ये दोन, तीन, आणि ” चार पर्याय आहेत, बरोबर? म्हणजे हे पदार्थ दर बारा दिवसांनी रिपीट होत असणार, हो ना? म्हणजे त्याच महिन्याच्या तेरा तारखेला आणि पंचवीस तारखेला परत एक तारखेचे तीन पदार्थ येणार!”

Story of Same Breakfast Again! in Marathi

“आमची अनिका म्हणजे अशा गणिती कोड्यांमध्ये एकदम हुशार!”

“छान, छान! आम्हाला आवडली बरं का ही मुलगी ! चल अनिका, आता तुला गरमागरम सगळं खाऊ घालतो.” कौतुकाने म्हणत म्हात्रेकाका आम्हाला मोठ्या डायनिंग हॉलमध्ये घेऊन गेले.

एकदम चवदार असा नाश्ता आम्ही सगळे मजेत खात होतो. बटाटेवडे चापत असताना अनिकाचे प्रश्न चालूच होते… झाडांना पाणी कोण घालतं, या फुलांचं तुम्ही काय करता, कलमं कशी करतात, कोणती फळं कोणत्या मोसमात येतात, तुम्ही त्या फळांचा कसा उपयोग करता… असे. काकाही मोठ्या हौसेने सगळी माहिती पुरवत होते.

Also Read : Story of There was a king and… in Marathi

पण अनिकाचं मन नाश्त्यातच अडकलं होतं !

“काका, तुम्ही नाश्त्याला चौथा पदार्थ ठेवायचा ठरवला आणि त्याचे पाच पर्याय असतील तर?”

“म्हणजे?”

“म्हणजे, समजा तुम्ही पराठे ठेवायचं ठरवलं, आणि पराठ्याचे पाच प्रकार असतील – आलू, गोबी, पनीर, मेथी आणि पालक. दर दिवशी वेगळे पराठे.”

“असं का? चालेल की. पण त्याचं काय?” “तर एका महिन्यात कोणतंही चार पदार्थांचं कॉम्बिनेशन रिपीट होणारच नाही.”

“कसं काय?”

“कारण, बघा हं, एक तारखेला असेल चीज सँडविच, पोहे, इडली आणि आलू पराठा. हेच पदार्थ परत एकत्र यायला मध्ये किती दिवस जायला लागतील ?”

“किती?”

“दोन, तीन, चार. आणि पाचचा लसावि आहे साठ!” तेच पदार्थ परत एकत्र यायला मध्ये साठ दिवस जायला लागतील. पण त्याच्या आधीच, म्हणजे पुढच्या महिन्याच्या एक तारखेला तुम्ही पुन्हा चीज सँडविच, पोहे, इडली आणि आलू-पराठाने सुरुवात कराल, हो ना?”

“खरंय पोरी!” जोराने हसून दाद देत काका म्हणाले, “महिन्यात कॉम्बिनेशन रिपीट होणारच नाही. पुन्हा तोच नाश्ता येणारच नाही. म्हणून तर आम्ही तो चौथा पदार्थ ठेवलेला नाही!”

Also Read : Story of There was a king and… in Marathi

आम्हा सगळ्यांना हसू फुटलं; पण त्यातूनही वेळ काढत अनिकाने पुढचा प्रश्न विचारलाच-

“बरं काका, आता सांगा, तुम्ही दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ कसे ठरवता?”

आणि सगळे पुन्हा एकदा हसत सुटले. अनिकाच्या डोक्यात आता जेवणांच्या पदार्थांचा लसावि फिरू लागला होता.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.