Story of Hanuman sitting on a horse

Story of Hanuman sitting on a horse in Marathi : घोड्यावर बसलेला हनुमान गोष्ट.

2 min read

Story of Hanuman sitting on a horse : घोड्यावर बसलेला हनुमान गोष्ट.”लग्न करीन तर मालिकेतल्या मुलाशीच!” अशी प्रतिज्ञा जेव्हा दीपानं जाहीर केली तेव्हा आभाळात विजांचा कडकडाट झाल्यासारखा वाटला. भीष्मानं जेव्हा लग्न न करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली तेव्हा महाभारतात जे वातावरण निर्माण झालं होतं, तसंच सेम दीपाच्या घरात घडलं. तिचे आईवडील तर अक्षरशः हबकून गेले. भावानं कपाळावर हात मारून घेतला. साधारणपणे खेडेगावात एखादी मुलगी ‘मी लग्नच करणार नाही,’ असं म्हणाली तर जसे सारे हवालदिल होतील, तसंच आता झालेल होतं.

फलटणसारख्या तालुक्याच्या गावात जन्मलेली ही पोरगी. दिसायला विलक्षण गोड. शिवाय एकुलती एक. गावातल्याच कॉलेजात बी.ए. होऊन रीतसर लग्नाला आलेली. लग्नाच्या बाजारात सध्या मुलींची टंचाई आहे, त्यामुळे मुलांपेक्षा मुलींचाच लग्नाच्या बाजारात सध्या ‘वरचष्मा’ आहे. त्यामुळे पूर्वीच्या बापांसारखे वधुपिते अलीकडे लग्न जमवण्यासाठी हवालदिल झालेले नसतात लग्न होण्याची समस्या अलीकडे भेडसावतच असेल तर ती मोठ्या प्रमाणात मुलांना आणि त्यांच्या बापांना (आणि आयांना) भेडसावते, पण तरीही ‘लग्न करीन तर मालिकेतल्या मुलाशीच!’ ही दीपाची प्रतिज्ञा तिच्या घरच्यांनाही अस्वस्थ करून गेली.

पण या घोषणेचे वृत्त कानी पडताच सर्वात अस्वस्थ झाला तो बोरिवलीचा राजू त्याचा खूप दिवसांपासून दीपावर डोळा होता. दर लग्नात ती कुठं ना कुठं दिसायची. प्रत्येक वेळी ती अगोदर दिसायची त्यापेक्षा अधिक सुंदर दिसायची. तिच्याशी आपलं लग्न व्हावं हे राजूचं स्वप्न होतं; पण काळ तर मोठा कठीण आला होता.

also read : Story of Corona on tickets and coins

आपण अगदी चुकीच्या काळात जन्मलो, असं कधी कधी राजूला वाटायचं. आधीच मुलींचा तुटवडा ! क्वचित एखाद्या घरात तरुण मुलगी सापडली तर तिला प्रचंड डिमांड असायची. तिच्याशी लग्न करायला पोरांची अक्षरशः रांगच्या रांग उभी असायची मुलांच्या बापांची आणि आयांची स्थिती फारच दयनीय झाली होती. आपल्या पोराचं लग्न होतंय की नाही या विचाराने त्याला लग्नासाठी योग्य सोडा, पण नुसती मुलगी तरी मिळते की नाही, या विचाराने त्यांची झोप उडून गेलेली होती.

राजूला तीर्थरूप सांगायचे, त्यांच्या काळात मुलाच्या मागे मुलीचे बाप हुंड्याच्या पिशव्या घेऊन लागायचे. मुलीच्या अंगावर दागदागिने घालून शिवाय थाटामाटात लग्नही लावून द्यायचे. अगदी बेतास बात कर्तृत्व असणाऱ्या मुलालासुद्धा त्या काळात लग्राच्या बाजारात बन्यापैकी किमत असायची राजूच्या निम्म्यानेही कर्तृत्व नसणाऱ्या तीर्थरूपांची त्यांच्या लग्राच्या वेळी इतकी काही ऐट होती की ज्याचं नाव ते! राजूला वाटायचं, वडिलांच्या ऐवजी आपणच अगोदर जन्म घ्यायला हवा होता. ला तरी निर्वेधपणे पार पडलं असतं. दुर्दैवाने आपण कधी जन्मायचं हे आपल्या हाती नसल्याने राजूचाही नाइलाज होता.

Story of Hanuman sitting on a horse

मुलींचा असा तुटवडा पडायलाही गेल्या पिढीतलेच नालायक लोक कारणीभूत आहेत, हे वेगळं सांगायला नकोच. त्यानी मुलींना जन्मच ध्यायचं स्वातंत्र्य नाकारलं. आता भोगा आपल्या कर्माची फळ! त्यामुळे आता मुलीच्या वडिलांना पैसे देऊन मुलाचं लग्न करण्याची वेळ मुलाच्या बापावर ओढवली होती, पण मुलीही आता शिकलेल्या असल्याने त्यांच्या बापाला पैसा देणाऱ्या वरपित्याच्या मुलाच्या गळ्यात त्या निमूटपणे माळ घालतील याची मुळीच गॅरंटी उरलेली नव्हती तशात या मुलींच्या चमत्कारिक अटी! मुलगा असाच पाहिजे अन् तसाच पाहिजे

राजूच बोरिवलीला एक झकास रेस्तरों म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर ‘रेस्टॉरंट’ किंवा त्याहीपेक्षा शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर ‘हॉटेल’ होतं. बोरिवलीत तुम्ही कुणालाही ‘हॉटेल पद्मासन’ कुठेय असे विचारलं तर ते थेट तुम्हाला राजूच्या हॉटेलात घेऊन येतील, एवढं फेमस ते हॉटेल होतं आजीचा आशीर्वाद म्हणायचा ‘पद्मा’ हे आजीचं म्हणजे वडिलांच्या आईचं नाव ती गेल्यावर त्यांनी हॉटेलच्या धंद्यात उडी घेतली. आपण आपल्या आईचा मुलगा आहोत, याचा वडिलांना फार अभिमान होता तिचं नाव अमर करण्यासाठी त्यांनी हॉटेलचं नाव ‘पद्मासन’ असं ठेवलं ‘पद्माज् सन तो पद्मासन’ अशी त्या नावाची मराठीत फोड करता येईल.

नावाला एक कॉमर्सची डिग्री घेऊन राजूनं गल्लधावर बसायला सुरुवात केली देवाच्या आणि गल्लचावरच्या फोटोतल्या महाराजांच्या कृपेनं धंदा उत्तम चाललेला होता. आता एवढ सगळ ठीकठाक असताना त्याचं ला जमायला तर अडचण येऊ नये ना? पण आजच्या मुलींना पोरगा नोकरदार आणि पगारदार हवा. इंजिनीयर हवा, आय. टी. तला हवा. असा हवा, तसा हवा… लाख अपेक्षा, डोक्यात एकदा हवा गेली की या अटी सुरू होतात अगदी खेड्यातली मुलगी असली तरी ती राजूसारख्याच्या गळ्यात निमूटपणे माळ घालेलच, याची खात्री नाही

आता ही गावाकडची फटाकडी पोर दीपा घ्या. नातेवाईकांपैकी कुणाचं लग्न निघालं की, ती हमखास राजूला दिसायची. मागल्या साताठ लग्रांपासून त्याचा तिध्यावर डोळा होता ती तशी त्याच्याकडे बघून हसायची, नखरे करायची, डोळे मुरडायची आणि राजू धीर एकवटून तिच्याशी बोललाच तर त्याच्याशी बोलायचीदेखील, पण एवढंच. त्याच्यापुढे काही नाही दर लम्रागणिक ती अधिकाधिक आकर्षक दिसायला लागलेली असल्यानं राजूची तर झोपच उडालेली होती. त्यान मनातल्या मनात तरी ठरवलं होतं की, करीन लाइ तर हिव्याशीच । प्रतिज्ञाच म्हणा ना! आता तिनच दुसऱ्या कुणाशी लग्न करायचं ठरवलं तर मग त्यालाही नाइलाजाने दुसऱ्या मुलीशी लग्र करावं लागलं असतं. अखेर लम्र होण हे महत्त्वाचं असल्यानं एवढं तर ‘कॉम्प्रोमाइज’ करण्याची त्याची तयारी होतीच.

also read : Story of Corona on tickets and coins

बोरिवलीला राजूच्या चुलतभावाच लग्न निघालं आणि अधिक सुंदर होऊन ती बोरिवलीला प्रकटली. त्याचबरोबर ‘या वेळी तिला लग्नाचं विधारायचं’ हेही त्यानं ठरवून टाकलं. आता थांबणार तरी किती काळ ? आणि तिच्यासाठी थांबायचं ठरवून गाफील राहिल तर फाडकन (मुस्काटात बसावी तशी) तिच्या लग्राचीच बातमी येऊन तोंडावर थडकायची. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करायला तयार नव्हता त्यानं तिच्या थोरल्या भावाला रामभाऊला सहज विचारतोय असं भासवून विचारलं, “काय दीपाच्या लग्राचे लाडू कधी देणार?”

रामभाऊ गावाकडं रोज जिम करणारा होता. त्याचा मेंदू गुडघ्यात होता तो तिरसटपणे म्हणाला, “तुला काय पडलंय ? गपगुमान हाटेलात भजी तळत बसायचं.”

‘आपल्याकडे आपल्या हॉटेलात भजी तळायचं काम आहे’ असा तिच्या भावाचा गैरसमज झालेला दिसतो, याचं राजूला वाईट वाटलं. शिवाय उडुपी धर्तीवर ‘हॉटेल पद्मासन’ चालवत असल्याने तिथं भजी, भेळभत्ता, गुडीशेव असले गावाकडले पदार्थ मिळत नाहीत, हे त्याला समजावून द्यावं म्हणून तो म्हणाला, “असं बधा रामभाऊ, आमचं हॉटेल हे फलटणमधलं हॉटेल नाही तिथे…”

“ज्यादा श्यानपन शिकवायच न्हाई गप पडायचं. समजलं?” रामभाऊनं संवादाचे दोरच कापून टाकले. झक मारली न् त्याच्याशी बोललो, असं त्याला बाटल पोरगा असा तर त्याचा बाप तर बोलण्यात ‘त्याचा बाप’ असणार हे उघड होतं. तेव्हा आता तिच्या जवळच्या नातेवाईकांपाशी चौकश्या करण्यापेक्षा दुसरा काही तरी मार्ग अवलंबणं श्रेयस्कर ठरेल, असा त्यानं विचार केला ज्या चुलतभावाच्या लग्रानिमित्त ती आलेली होती त्या भावाला एक सख्खी बहीण होती वैशाली तिचं नाव तिला राजूच्या हॉटेलातला कांदा उत्तप्मा प्रचंड आवडायचा त्यामुळे तिची दर आठवड्याला एक तरी फेरी हॉटेलात ठरलेली असायची ती बरोबर तिची एखादी मैत्रीण घेऊन यायची. तिच्याकडून राजू कधीच बिल घेत नसल्यानं तिलाही आपल्या मैत्रिणीसमोर फुकटचा रुबाब दाखवायला आवडायचा त्यानं वैशालीला गाठलं.

“काय गं वैशाली, बऱ्याच दिवसांत चक्कर मारली नाहीस हॉटेलात?” त्यानं तिला गातून विचारलं.

“असं काय बोलतो? परवा तर आले होते की। माझ्याबरोबर ती रेवा होती बघ.”

खरं तर त्याला दोन दिवसांपूर्वीच ती येऊन गेल्याचं लख्ख आठवत होतं आणि ती रेवा नावाची मैत्रीण ती तर अविस्मरणीयच होती, पण एक प्रोटोकॉल म्हणून तो कधी गल्ला सोडून वैशालीच्या मैत्रिणींची दखल घ्यायला त्यांच्या टेबलापाशी यायचा नाही आपल्या चुलतभावाचा हा सजन स्वभाव वैशालीला आवडायचा.

“मरू दे ती रेवा!” तो घाईघाईने तो विषय मध्येच तोडत तिला म्हणाला, “वैशाली, ती दीपा आहे ना…”

“तिचं काय? आवडलीय का तुला ती?” तिनं थेट सवाल केला.

आता दचकायची पाळी त्याची होती. हिला कसं कळलं? पण त्यानं हो किंवा नाही म्हणायच्या आतच ती पुढे म्हणाली, “ती नंबर एकची चक्रम आहे. सारखी टीव्हीवर मराठी मालिका लावून बसलेली असते. आपला नवरा हा मालिकेत काम करणारा असला पाहिजे, अशी तिची अट आहे.”

“ही कसली अट ? यडीबिडी आहे की काय? मालिकेचं काम नसेल तेव्हा बरेच कलाकार आमच्या हॉटेलात येऊन बसतात. एका चहावर तासन् तास त्यांना कोण बसून देणार? चित्रनगरीतील बरीच जनता आमच्या हॉटेलात पडीक असते. काळं कुत्रंही विचारत नाही त्यांना. गाढव आहे ही पोरगी!”

“माझ्यापाशी हे सारं बोलून काय फायदा? तिला सांग ना तूच” एवढं म्हणून तिनं चक्क दीपाला हाक मारली, “दीपा ए दीपा.” दीया तिच्या दिशेने यायला लागल्यावर ती म्हणाली, “तू सांग तिला ती गाढव आहे म्हणून.”

राजू चांगलाच गडबडला. त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून वैशाली खट्याळपणे हसत होती.

दीपा त्यांच्याजवळ आली. “काय गं?” तिनं विचारलं.

हा राजू बध काय म्हणतोय ते.” “

“मी मी… कुठं काय?” राजू गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला. त्याला ती अशी येऊन थेट पुढ्यात उभी ठाकल्यामुळे काय बोलावं ते सुचेना.

“अगं, त्याचं हॉटेल आहे ठाऊक आहे ना तुला? तर त्याला तुला हॉटेल बधायला बोलवायचं आहे” वैशाली हसत म्हणाली

“मग राजूला मला सांगायची लाज वाटते की काय ? राजू, तू मला तुझ्या तोंडानं आमंत्रण दिल्याशिवाय मी काही येणार नाही.” मिस्कीलपणे हसत ती म्हणाली.

मग राजूनही स्वतःला सावरून तिला हॉटेलला भेट देण्याची विनवणी केली “उद्या ब्रेकफास्टलाच ये.”

“मी आलं तर चालेल ना?” वैशालीने लटकेपणे विचारलं, “का फक्त बाहेरगावच्या पाव्हण्यांनाच निमंत्रण आहे?”

“हिला अगोदर बोलावलेलं आहे बरं का. तिलाच मी तुला घेऊन यायला सांगितलं आहे. नक्की या उद्या सकाळी ९ वाजता. मी वाट पाहतो आहे.” तो खुशीत म्हणाला.

कधी एकदा उद्याची सकाळ उजाडते आहे आणि कधी एकदा दीपा आपल्या हॉटेलला भेट द्यायला येते आहे, असं राजूला होऊन गेलं. रात्री तो तिच्या सहवासाची रंगीबेरंगी स्वानं पाहातच झोपी गेला.

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली ठेवणीतले कपडे घालून तो आज ‘हॉटेल पद्मासन’ वर हजर झाला. गल्ल्यावर बसायला मैनेजर नेमलेला होता, पण अनेकदा हौस म्हणून राजू स्वतःच तिर्थ बसायचा त्याला तो रुबाब वाटायचा

हळूहळू हॉटेलमध्ये गर्दी जमू लागली. बाहेरच्या गार्डनमध्ये सीरियलमध्ये सध्या काम नसणारं नेहमीचं टोळकं येऊन बसलं. आता प्रत्येकी एका चहावर ही मंडळी दोन-तीन तास काढणार, हे ठरलेलं होतं. त्यानं गार्डनमधलंच एक टेबल दीपा आणि वैशाली यांच्यासाठी राखून ठेवलेलं होतं. तो नेहमीप्रमाणे कामात मग्न असल्याचं दाखवत होता तरी त्याचं सारं लक्ष त्या दोधी कधी हॉटेलात प्रवेश करताहेत, याकडे लागून राहिलेलं होतं. त्या गडबडीत त्यानं एका गि-हाईकानं शंभरची नोट दिलेली असताना पीचशेची नोट समजून चारशेच्या वर रक्कम त्याला परत देऊन टाकली. चंद्याबाबत असा घोटाळा त्याच्या बाबतीत आजतागायत झालेला नव्हता, त्याचं श्रेय दीपालाच देणं भाग होते.

also read : Story of Corona on tickets and coins

आणि ती आली. दीपा, त्याच्या स्वप्नाची राणी, तिनं तालुक्याच्या गावात ‘मॉडर्न’ वाटेल असा गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला होता. त्यात त्याला ती परीच भासली. तो लगबगीने गल्ल्यावरून उठला. मॅनेजरला त्यानं तयारच ठेवलेलं होतं. त्यानं त्याची जागा तत्परतेनं घेतली आणि तो जवळ जवळ धावतच त्यांच्या स्वागताला सामोरा गेला. बाहेरच्या टेबलावर त्यांना तो स्वतः घेऊन गेला, तिघेही बसल्यावर त्याला काय बोलावं ते सुचेना. त्यानं अखेर धंद्याच्या संकेतानुसार ‘काय घेणार’ असा प्रश्न केला आणि त्यांची ऑर्डर वेटरला सांगितली. आता वातावरण जरा स्थिरस्थावर झालेलं होतं. भिरभिरत्या नजरेने हॉटेल न्याहाळत दीपा त्याला म्हणाली, “छान आहे की तुझं हॉटेल!”

“तुला चांगलं वाटलं ते लई भारी झालं” तो म्हणाला, “आप की पारखी नजर को बंदा वाकई पसंद आ गया, इस का हम शुक्रगुजार करते हैं।”

“बंदा नहीं, बंदे का हॉटेल हमें पसंद आ गया.” दीपानं त्याला भानावर आणलं आणि पुढे मात्र त्याच्या हिंदीला दाद देत ती म्हणाली, “मुंबईत राहिलं की हिंदी किती सुधारतं नै… तू आता अगदी अदालतमधल्या राकेशसारखा बोललास. तो कोर्टात अगदी असाच हिंदी बोलतो.” दीपाच्या या बोलण्यानं त्याचं मन मोहरून गेलं; पण त्याला चर्चा आता सीरियल्सकडे बळू द्यायची नव्हती. कारण एकदा का ती त्या जंगलात घुसली असती तर तिला बाहेर काढणं प्रत्यक्ष परमेश्वरालाही अवघड होतं.

“दीपा, तुला एक विचारायचं होतं,” त्यानं गंभीर चेहरा करत म्हटलं. तिनं उत्सुकतेनं त्याच्याकडे पाहिलं. आता बोलायला सुरुवात करणार एवढ्यात वेटर खाद्यपदार्थ घेऊन आला. साक्षात मालकानंच ऑर्डर दिली म्हटल्यावर कोण करंटा उशीर करील? खाद्यपदार्थ समोर मांडण्यात बेटर मग्न झाला. त्या धांदलीत त्याची प्रस्तावना वाया गेली. नंतर वैशालीच त्याला म्हणाली, “आता आम्हाला निवांत खाऊ दे. मग काय बोलायचं ते बोल.”

राजूला त्यांच्या खात्या तोंडाकडे बघत बसण्याखेरीज काही पर्याय उरला नाही त्या दोघी चविष्ट कांदा उत्तप्पा मन लावून खात सुटलेल्या होत्या. त्यांची खाद्यसमाथी भंग करायचं राजूच्या जिवावर आलं. तो चुळबुळत जागेवरच बसून राहिला त्यांनी नंतर इडली सांबार मागवलं, तेही उत्तप्या संपायच्या आतच वेटरनं आणून हजर केलं. दीपासुद्धा वैशालीइतकीच खादाड़ असेल, असं राजूला वाटलं नव्हतं.

त्या दोघींनी कॉफी संपवल्यावर आता आपण लगेच तिला मागणी घालण्याच्या मुद्दचावर आलं पाहिजे, हे राजूनं ओळखलं शुभ कार्याला उशीर करण्यात काय अर्थ आहे? दीपा खाण्यापिण्यातून मोकळी होऊन आजूबाजूला नजर फिरवत असतानाच त्यानं पुन्हा सुरुवात केली, “दीपा, मला तुला एक विचारायचं होतं….”

एवढ्यात दीपाचे लक्ष समोरच्या रिकामटेकड्या टोळक्याकडे गेले. तिचे डोळे चमकले. ती चित्कारली, “यौ! अगं वैशू, तो बघ, मकरंद, ‘गुस्सा तेरा हसिन है’ मध्ये त्यानं सिमरनच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे ना… कसला गोड दिसतोय ना! मी ना या मालिकेचा एकही एपिसोड चुकवला नाही. रोज रात्री १० ते ११ बघत बसायचे आणि त्याच्याजवळ बसलेला विरु ‘नियतीचे नाते’ मधला गं… त्या मालिकेचा शेवटचा एपिसोड पाहताना मी ढसाढसा रडले होते आणि तो श्री ‘डोळ्यातले काजळ गेले बाहुन’मधला श्रीकांत- सारे त्याला ‘श्री’ म्हणूनच ओळखत होते.” ती त्या मालिकेचे शीर्षकगीत गाऊ लागली.

‘डोळ्यातले काजळ गेले वाहन

डोह दुःखाचा मी गेले पोहून’

राजूच्या प्रस्तावाकडे तिचे लक्षच नव्हते. तिनं बेधडक त्या टोळक्याच्या दिशेने हात हलवला. त्या टोळक्यानंही तिच्या दिशेने हात हलवून तिला प्रतिसाद दिला. राजूकडे साफ दुर्लक्ष करून ती थेट त्यांच्यातच गेली आणि प्रत्येकाची ओळख करून “तुझं या मालिकेतलं काम किती चांगलं झालंय तुझं त्या मालिकेतलं काम किती सुंदर झालंय तुझी मालिका तर मी रात्री १० ते ११ बघून शिवाय दुसऱ्या दिवशी दुपारी कॉलेजमधून आल्यावरही कशी बघायची” अशा गप्पा तिनं सुरू केल्या, त्या बेकारांना तर हा सुखद धक्काच होता. आपल्या मालिका महाराष्ट्रातल्या कुठल्याशा तालुक्याच्या गावातली मुलगी इतकी मन लावून बघत असेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. दीपा त्यांच्यात चांगलीच रमली होती. ती त्यांना टाळ्या देत होती, त्यांच्याबरोबर खिदळत होती. तिनं त्यांच्याबरोबर पुन्हा कॉफी घेतली. इकडे राजूची फजिती पाहून वैशालीला गालातल्या गालात हसू येत होतं. खरं तर तिलासुद्धा त्या नटमंडळींशी ओळख करून घ्यायला आवडलं असतं; पण राजूपाशी कोणी तरी राहणं जरुरीचं होतं. त्याला अगदीच एकटं एकटं वाटलं असतं, म्हणून तिनं तो मोह टाळला; पण तिचा एकूण आविर्भाव पाहून त्याला तिची तगमग लक्षात आली. मग तो काहीसा वैतागून म्हणाला, “तुलाही त्यांच्याबरोबर गप्पा बारायच्या असतील तर तूही त्यांच्यात खुशाल जा.”

पडत्या फळाची आज्ञा घेऊन वैशालीही पळाली, मग मात्र एकटं तिथं बसण्यात अर्थ नाही, असा विचार करून तो खिन्नपणे उठला. या मूर्ख मुलीचं हृदय जिंकायचं असेल तर आपल्याला आता कुठल्या तरी मालिकेत काम करण्याशिवाय मत्यंतर नाही, हे त्याच्या लक्षात येऊन चुकलं.

तो गल्लचावर बसायला निघाला असता त्याला कोपन्यावरच्या टेबलावर देवेश दिसला. जाडजूड देवेश वेळ मिळेल तेव्हा त्याच्या हॉटेलला भेट द्यायचा. गार्डनमधील कोप-यात त्याचं विशिष्ट टेबल होतं. त्याचं हिंदी-मराठी- भोजपुरी-गुजराती अशा सिनेमांना आणि टीव्ही मालिकांना ज्युनियर आर्टिस्ट पुरवण्याचं काम होतं. त्याला पाहून राजूला काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं गल्लयाकडे जाण्याचं सोडून आपला मोर्चा त्याच्या टेबलाच्या दिशेने वळवला.

त्याच्यासमोर बसल्यावर राजू त्याला म्हणाला, “देवेश, यार एक काम होतं.”

“बोल” देवेश म्हणाला.

“मला उद्याच्या उद्या कुठल्या तरी मालिकेत घुसव, मला मालिकेत काम करण्याची इच्छा आहे.”

“एवढं चांगलं हॉटेल सोडून ही काय दुर्बुद्धी झाली ?” त्यानं विचारलं.

देवेश त्याचं नेहमीचं गि-हाईक होतं; पण त्याहीपेक्षा जास्त तो त्याचा मित्र होता. त्यानं दूरवरच्या टेबलाकडे बोट दाखवून त्याला दीपा दाखवली. तिचं मालिकांचं वेड सांगितलं. तिची प्रतिज्ञा ऐकवली आणि ती इथे आहे तोच कुठल्या तरी मालिकेत थोबाड रंगवून एकदा काम करताना तिला दाखवायचं आहे. ही त्याची तातडीची निकडही सांगितली. देवेशला सारा प्रकार लक्षात आला. दोस्तासाठी एवढीशी गोष्ट करणं हे त्याला मुळीच अवघड नव्हतं. मालिकेतल्या एखाद्या एपिसोडमध्ये आगंतुक पात्र घालण्याची वेळ बऱ्याचदा येते. असा वेळ मारून नेण्यासाठी आणि भरून काढण्यासाठी तिथं हजर असणारे मालिकेचे लेखक तिथल्या तिथं काही बदल करून देतात. है सारं त्याला ठाऊक असल्यानं देवेशनं त्याला काम देण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की, यासाठी वेळ अत्यंत कमी होता. तरीही देवेशनं या प्रकरणात त्याला वाट्टेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं.

देवेश हा एकदा सोपवलेल्या कामाचा तुकडा पाडणाराच माणूस होता. त्याला ‘नाही’ म्हणणं ठाऊकच नव्हतं. त्यानं त्याला दुसऱ्या दिवशीच ११ वाजता दीपाला घेऊन चित्रनगरीत येण्याचं आमंत्रण दिलं. “तिथं कुठल्या ना कुठल्या तरी मालिकेचं शूटिंग चालूच असतं. तुझी सोय करून देतो. डोन्ट बरी.”

देवेशच्या या आश्वासनामुळे राजू निश्चिंत झाला. तो निवांत गल्लल्यावर जाऊन बसला. दीपानं मनमुराद गप्पा मारल्या त्या फुकट्यांना तिनं ‘आपलंच हॉटेल आहे’ असं सांगून खायला प्यायला घातलं. त्यांनीही ‘खूप दिवसांनी उपासाचं पारणं फिटतं आहे, तेव्हा घ्या हादडून’ असा स्वतःशी विचार करून मनमुराद खाल्लं ही चैन राजूच्या जिवावर झाली, त्यांची आणि त्यांच्यावर इंप्रेशन मारणाऱ्या दीपाची त्यांचं आता निरोप घेताना सेल्फी-सेशन चालू होतं. दीपा प्रत्येक रिकामटेकड्या नटाच्या बरोबर स्वतःचा सेल्फी काढत होती. सेल्फी काढून झाल्यावर तिच्या चेहऱ्यावर मुंबईला आपण आलो याचं सार्थक झाल्याचा समाधानी भाव तरळत होता.

ती जेव्हा गल्ल्यावर बसलेल्या राजूपाशी आली तेव्हा त्याचे दोन्ही हात हातात घेऊन आणि ते गदागदा हलवून ती अगदी मनापासून म्हणाली, “थैंक्यू राजू, थैंक्यू तुझ्यामुळे आज सीरियलमधल्या या सान्या नटांचं दर्शन झालं. तू तुझ्या हॉटेलात बोलवल्यानेच हे घडू शकलं.”

also read : Story of Corona on tickets and coins

“कुणी लग्नासाठी सापडला की नाही?” राजूनं तिला सरळ विचारूनच टाकलं. त्या प्रश्नामागे तिच्या विक्षिप्त प्रतिज्ञेचा राग होता. त्याला फाट्यावर मारून ती त्यांच्यात स्मली याची चीड होती; पण तिला तो प्रश्न सरळ वाटला. “नाही रे, असं पहिल्या भेटीत कोण कधी लग्नाचं बोलेल का? तू तरी बोलशील का?”

“तशी संधी तू दिलीस तर नक्की बोलीन.” तो बेधडक म्हणाला. यावर ती खळखळून हसली. तिला वाटलं राजू हा विनोदच करतो आहे.

“त्यांनी तुला शूटिंग पाहायला नाही का बोलावलं ?” राजूनं विचारलं.

“अरे, मी दोनतीनदा म्हणाले त्यांना, मला तुमचं शूटिंग पाहायचं आहे; पण त्यांच्यापैकी कुणीच मला बोलावलं नाही. नाही तर मी उद्याच तिथं गेले असते.”

“अगं, ती बेकारांची फौज तुला काय बोलवणार? त्यांच्यापैकी कुणाच्याही हातात सध्या काम नाही. ज्याच्या हातात सध्या काम आहे तोच तुला शूटिंग दाखवणार.”

“पण असा माणूस कुठं शोधणार मी?” तिनं व्याकूळ होऊन विचारलं.

“तुझ्यासमोरच आहे. गल्लचावर बसून तुझ्याशी बोलतो आहे.” गालातल्या गालात हसत तो तिला हे म्हणाला.

“तू?” ती आश्वर्याने किंचाळलीच. तिच्याबरोबर असणारी वैशालीही त्याच्याकडे चकित होऊन पाहू लागली.

“हो मी.” राजू खांदे उडवून म्हणाला, “मी मनात आणलं तर शंभर मालिकांमध्ये कामं मिळवू शकतो; पण मला हा हॉटेलचा धंदा सांभाळायचा असतो. त्यामुळे मी फक्त निवडकच कामं घेतो.” तिच्या डोळ्यांत त्याच्याविषयीचा आदर आणि प्रेम दाटून आलं होतं. केवळ वडिलांचा धंदा सांभाळण्यासाठी त्याला आपल्यातल्या कलाकाराची घुसमट सोसावी लागते आहे, या भावनेने तिचं मन सहानुभूतीने भरून आलं.

“उद्या माझ्याबरोबर येशील का शूटिंग पाहायला?” राजूनं विचारलं.

“नक्की.” तिनं भारावून त्याचा हात हातात घेतला. अशा हिन्याची आपल्याला थोडी उशिरा ओळख झाली, याचा पश्चात्ताप तिच्या आवाजात जाणवत होता. पुढं तिनं प्रश्न केला,

“पण तू कोणत्या मालिकेत काम करतो आहेस, ते तर सांगशील?”

“ते सिक्रेट आहे. आता उद्या तू प्रत्यक्षच पाहा ना” म्हणाला, “मी उद्याच तुला न्यायला येतो. वैशाली, तूही तो तयार राहा.” वैशालीला त्यांच्याबरोबर यायला आवडणारच होतं. एक तर तिला राजू-दीपा यांचं जे काही चाललं होतं तेही एखाद्या मालिकेइतकंच इन्टरेस्टिंग वाटत होतं आणि तिला तसंही शूटिंग पाहायला आवडणारच होतं. त्यामुळे तिनं ‘नाही’ म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

“थैंक्यू राजू, थैंक्यू” तिनं पुन्हा एकदा भारावून त्याचा हात हातात घेतला आणि आभार प्रदर्शन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच आपल्या वडिलांची आलिशान टोयोटा इटिऑस घेऊन तो त्या दोघींना आणायला गेला. दीपा तर एवढी नटली होती की, जसं काही तिचंच शूटिंग होतं. वैशाली तिची पाठराखण करायला तयारच होती. दीपाला त्यानं पुढच्या सीटवर बसायला सांगितलं. “पुढंच बस म्हणजे जाता जाता तुला मुंबईदर्शनही होईल. एका दगडात दोन पक्षी.”

त्याची कार आत आल्याबरोबर देवेश धावत आला

वातावरणनिर्मितीसाठी तो हिंदीत म्हणाला, “आइये, राजूजी, डिरेक्टरसाब आप का ही इन्तजार कर रहे हैं।”

“अभी आता हूँ।” राजू म्हणाला.

त्या दोघींना सुरक्षित जागी बसवून राजू त्याच्याबरोबर आत निघाला. जाताना त्यानं विचारलं, “कोणती मालिका आहे?”

“हनुमान चालिसा.”

“पौराणिक मालिका ?” दचकून राजूनं विचारलं, “तुला हीच मालिका माझ्यासाठी सापडली का ?”

“आज इथं याच मालिकेचं शूटिंग होतं. फक्त चाळीस एपिसोडची मालिका आहे.” देवेशनं खुलासा केला.

“आणि मी कुठला रोल करणार आहे?”

“वानरदळातील एक वानर.”

अत्यंत खट्टू झालेल्या अवस्थेत राजू होता; पण एव्हाना तो कपडेपटात पोचलेला होता, कपडेपटात ज्युनियर आर्टिस्टांची एकच गर्दी उसळलेली होती. तिथं एक मॉडर्न

दिसणारी विशीतली असिस्टंट मुलगी जोरजोरात ओरडत होती, “चला चला, कपडे काढा आणि इथली चड्डी चढवा.” काही बोलण्याच्या आतच कुणी तरी त्याची पँट ओढली. वरचा शर्टही आणखी कुणी तरी काढला. पँट सुटते न तुटते तोच कुणी तरी त्याला ती काळी लंगोटवजा चड्डी चढवलीदेखील. मांड्याना घट्ट बसणारी ती चड्डी होती. तिला मागील बाजूला एक वळणदार शेपूट फुटलेलं होतं. ती चड्डी चढवल्यावर त्या दाटीत एकमेकांची शेपटं एकमेकांना लागत होती; पण कुणी मनावर घेत नव्हतं. जरा पुढं गेलं की दुसरी अशीच एक स्कर्टवाली तरुणी प्रत्येकाला एक केसाळ जाकीट देत होती. ते चढवल्यावर अंगावर केस उगवल्यासारखे दिसत होते. पुढं गेलं की तिसरी एक बाई त्यांच्या डोक्यांवर फटाफट वळवलेल्या केसांचा टोप चढवत होती. पुढच्या टप्प्यात एक पुरुष त्यांच्या चेहऱ्यांवर वानराचा मुखवटा चढवत होता. शेवटची एक मुलगी प्रत्येकाच्या खांद्यावर एक गदा ठेवत होती. सरतेशेवटी एक रंगारी हातातल्या ब्रशने त्यांच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे दोन फटकारे मारत होता. त्यानंतर संपूर्ण देह दिसेल असा भलामोठ्ठा आरसा तिथे टांगलेला होता. त्यात स्वतःचं रूप पाहिल्यावर राजू दचकलाच. आरशातलं ते भलंमोठं वानर पाहून त्याचं अक्षरशः ‘माकड’ झालेलं होतं.

शॉटला अजून वेळ होता. तेव्हा तो याच अवतारात दीपा आणि वैशाली यांना भेटायला गेला. त्यांची थोडी गंमत करावी म्हणून त्यानं त्यांच्या पाठीमागून एन्ट्री टाकली. आणि गदा नाचवत तो एकदम ‘जय हनुमान’ असं जोरात ओरडून टुणकन उडी मारून त्यांच्यासमोर प्रकटला.

“ई SSS” दीपा किंचाळलीच.

दोघी अचानक ‘हे वानर कुठून आलं’ म्हणून घाबरल्या. ताडकन बाकावर उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहन्यावरचे भाव पाहून राजू चांगलाच गडबडला; पण त्याचा गडबडल्याचा भाव त्याच्या मुखवट्याआड दडून गेला.

“कोण तुम्ही? आणि सरळ असं बायकांसमोर येऊन उडी मारता ? तुमच्याविषयी मॅनेजमेन्टकडे तक्रार केली पाहिजे.” वैशाली रागाने म्हणाली.

“सॉरी, सॉरी,” तो वरमून (आणि त्याच वेळी आवाज बदलून) म्हणाला, “तुम्हाला राजू सरांचा निरोप देण्यासाठी आलो होतो.” अचानक त्याला हे आवाज बदलण्याचं सुचलं. मुखवट्यामुळे त्याला तसंही ‘नॉर्मल’ बोलणं कठीणच जात होतं आणि या अवतारात त्यांनी आपल्याला अजिबात ओळखलेलं नाही, हे त्याच्या लक्षात येऊन चुकलेलं होतं; पण तरीही हलवून खुंटा बळकट करण्यासाठी तो म्हणाला, “राजू सरांचा अजून मेकअप चालू आहे. त्यांची हिरोची भूमिका आहे ना या सीरियलमध्ये.”

“हिरोची?” दीपानं विचारलं.

“म्हणजे साक्षात मारुतीची हनुमानाची. त्यांच्यावर तर या सीरियलची सारी भिस्त आहे त्यांच्या मेकअपलाही त्याचमुळे वेळ लागतो आहे. अजून शॉट तयार व्हायला एक तास तरी लागेल. तेव्हा तुम्ही आजूबाजूला चक्कर मारून या, असा राजू सरांचा निरोप आहे. बाहेर कुठं कुठं हिंदी नट-नट्यांचं शूटिंग चालू असेल तर ते तुम्हाला पाहायला मिळेल, एक तासांनी थेट आत या.”

“पण राजूला स्वतःला फोन करायला काय झालं?” रागाने दीपाने विचारलं,

“तुमचा प्रश्न बरोबर आहे, मॅडम. या हनुमानाच्या भूमिकेमुळे त्यांचं तोंड बांधलेलं आहे. मोबाइल तोंडाजवळ नेता येत नाही. मुखवटा मध्ये येतो. शिवाय नीट बोलता येत नाही. त्यामुळे आवाज दुसऱ्या कुणाचा तरी वाटतो. कॉश्च्युम प्ले करायचा म्हटलं की हजार कटकटी असतात. राजू सरांसारखा तसाच ताकदीचा नट असल्याशिवाय तो अशा भूमिका करायला तयार होत नाही. सामाजिक सीरियलमध्ये काय तुम्ही अंगावरच्या कपड्यांवरच काम करायला उभे राहिलात तरी चालू शकतं, पण इथं तसं नाही…”

त्यांना त्याचं प्रवचन ऐकण्यात फारसा रस नव्हता. त्या तडक उठल्या आणि त्याच्याशी अधिक न बोलता भिरभिरत्या नजरेने चित्रनगरीत संचार करू लागल्या. एके ठिकाणी गर्दी दिसली तेव्हा त्या गर्दीच्या दिशेने निघाल्या. तिथं एका झाडाखाली आलिया आणि रणवीर सिंग यांच्यातला प्रणयप्रसंग चालू होता. तो तिला मिठीत घेतो आणि तिचं कडकडून चुंबन घेतो, असं दृश्य होतं. आगामी ‘प्रॉडक्शन नं. ४’ या सिनेमाचं शूटिंग चालू होतं. चित्रनगरीत आल्याचं, इतका वेळ थांबल्याचं सार्थक झालं, असंच त्या दोघींना वाटलं. एकेक शॉट घेताना किती तरी रिटेक होत होते. शॉट झाला की आलिया आणि रणवीर एकमेकापासून दूर व्हायचे आणि एकमेकांत हास्यविनोद करायचे. त्या दोघाना पाहून या दोघींच्या डोळ्यांच पारणं फटल होते या सान्या गडमठीत किती वेळ गेला दोघींना भानच उरल नाही.

त्या नाइलाजाने आणि घाईघाईने परत फिरल्या, तर इकडे अतिभव्य शॉट लागलेला होता. त्यात बजरंगबली हनुमान घोडयावर बसून गदा गरगर फिरवत वेतो आणि त्याच्याबरोबर बाकी बानरदळ पळत पळत आणि गदा नाचवत येते, असं मोठं वीरश्रीयुक्त दृश्य होतं. सहसा हनुमानाला कोणी घोड्यावर सलेले कुठल्या पुस्तकात किया चित्रात पाहिलेलं नव्हतं; पण बसलेल सेवई कलात्मक स्वातंत्र्य या मालिकेत घेतलेलं होतं. थानरसेना हनुमानाबरोबर अशी पळत आल्याचं दृश्य पाहून कोणत्याही बानरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले असते. राजूला मागल्या बानरदळात पळताना धाप लागलेली होती. कधी एकदा कपडे बदलून बाहेर येतो आहे, असं त्याला झालं होतं त्यानं देवेशला त्या दोघींना बाहेर नेऊन काही तरी कोक किंवा पेप्सी द्यायला सांगितलं, तरी वानराचा मेकअप उतरवून मनुष्यावस्था धारण करून त्या तिघांपाशी पोचायला त्याला सुमारे पाऊण तास लागला.

also read : Story of Corona on tickets and coins

त्यानं आल्या आल्या दीपाला विचारलं, “कसा वाटला माझा हनुमानाचा रोल ?”

“खूपच मस्त, घोड्यावर तू खूपच रुबाबदार दिसत होतास.” दीपानं त्याला वाईट वाटू नये म्हणून त्याची खोटी स्तुती केली. त्याच्याही ते लक्षात आलं, पण आपण जी भूमिका केलीच नाही, ती आपण केली, असं समजून दीपा दाद देते आहे, याचं त्याला मनातल्या मनात हसू आलं.

“आता टीव्हीवर बघताना तुला आणखी गंमत येईल.” राजू म्हणाला.

देवेशही त्याच्या भूमिकेची तोंड फाटेपर्यंत स्तुती करत होता. त्याच्या अशा बोलण्यानं आपण केलेल्या बनावाचा दीपाला सुगावा लागेल की काय अशी त्याला भीती वाटत होती, पण तसं काही झालं नाही. दीपा आणि वैशालीला भूक लागलेली होती; पण आता अध्येमध्ये खाण्यापेक्षा थेट आपल्याच हॉटेलवर जाऊ, असं राजू म्हणाला. ती कल्पना त्या दोघींनाही खूप आवडली.

परतताना कारमध्ये दीपा त्याच्याशेजारच्या सीटवरच बसलेली होती. तो तिला म्हणाला, “काय सांगू दीपा, देवेशनं मला तीन-चार डेली सोप्ससाठी विचारलं होतं. सगळीकडे मला प्रमुख रोल ऑफर करत होते. डेली सोप म्हणजे रोजची मालिका.

“हो. मला माहिती आहे. मला काल सांगितलं ते श्रीनं. मग का नाही ऑफर स्वीकारलीस?”

“पण एवढा वेळ कोण देणार त्यासाठी? एकदा डेली सोप स्वीकारला की ती फॅक्टरीच असते. आमचे तीर्थरूप तर म्हणतात, तुला नाही ते भिकेचे डोहाळे का लागले आहेत? चांगलं चालणारं हॉटेल असताना त्यात लक्ष घालायचं सोडून हे नाही ते उद्योग तुला सांगितलेत कोणी? त्यांचंही बरोबर आहे. मालिकेत काम करण्यापेक्षा पंचवीस पट पैसा आमच्या हॉटेलच्या धंद्यात आहे.”

“काय सांगतोस काय?” दीपानं डोळे विस्फारून विचारलं.

“मग? खोटं सांगतोय की काय?” त्यानं विचारलं.

“मला एक सांग राजू, वडिलांना तूया तरी मालिकेत काम केलेलं कसं चालणार आहे? ही मालिका तरी तू कशी काय घेतलीस?” दीपानं विचारलं.

“पहिलं म्हणजे माझे वडील कधीही टीव्हीवरील मालिका बघणार नाहीत; पण समजा, त्यांनी ही मालिका बघितलीच तर त्यांना घोड्यावर बसलेला हनुमान मीच आहे, हे अजिबात ओळखता येणार नाही. त्यांनाच काय कुणालाही, अगदी मलासुद्धा ते ओळखता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त चाळीस भागांची मालिका; चुटकीसरशी संपून जाईल. डेली सोपसारखी वर्षानुवर्षं चालणार नाही आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे…”

“ते कोणतं?”

“तू.”

“मी?” दीपानं आश्चर्याने विचारलं.

“तुझी ती आचरट प्रतिज्ञा गं… मालिकेत काम करणाऱ्या मुलाशीच तू लग्न करणार आहेस ना. त्यामुळे मला करावं लागलं काम. आता मी तुझ्याशी लग्न करायला पात्र म्हणजे क्वालिफाइड झालो ना?” त्यानं तिच्या हातावर हात ठेवून विचारलं. त्याचा प्रश्न ऐकून तिला एकदम हसूच आलं.

ती म्हणाली, “हो.”

काही काळ असाच आनंदावस्थेत गेल्यावर आपले टपोरे डोळे त्याच्यावर रोखून तिनं विचारलं, “तुला एक विचारू?”

“विचार ना…”

“मला अगदी खर्र खर्र सांग- तो घोड्यावर बसलेला हनुमान तू नव्हतासच ना?”

तिच्या प्रश्नानं तो उडालाच. अचानक तो गोंधळून, गडबडून, गांगरून आणि घाबरून गेला. म्हणाला, “अं… म्हणजे काय आहे… दीपा… अं… हे… हे… तू कसं ओळखलस ?”

यावर हसत ती म्हणाली, “घाबरू नकोस, राजू, तू तो हनुमान नसलास तरीही मी तुझ्याशी लग्न करणारच आहे.” आणि तिनं अत्यंत प्रेमानं त्याच्या हातावर हात ठवला. आपल्याला फक्त सुंदरच नाही तर चतुरही बायको मिळणार या आनंदात राजू मनोमन धन्य झाला.

मागे बसलेल्या वैशालीनं या रोमॅन्टिक नाट्याला टाळ्या वाजवून मनापासून दाद दिली.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.