Story of Crown of Dew in Marathi

Story of Crown of Dew in Marathi : दवबिंदूचा मुकुट गोष्ट.

1 min read

Story of Crown of Dew in Marathi : दवबिंदूचा मुकुट गोष्ट.

चद्रनगरीचे चंद्रसेन महाराज महालात फेऱ्या मारत होते. त्यांचा चेहरा चिंतामग्न दिसत होता. कारणही तसेच होते. त्यांची कन्या चंद्रकला विवाहयोग्य झाली होती. दिसायला सुंदर, बुद्धिमान होती; पण तिचा विवाह होत नव्हता. कारण विवाहेच्छुक राजकुमारांपुढे तिने एक पण मांडला होता- ‘जो युवक दवबिंदूंचा मुकुट बनवून तिच्या डोक्यात घालील त्या युवकाशी ती लग्न करील, अन्यथा कुंवारी राहीन.’

चंद्रकलेला निसर्गाची ओढ होती. निसर्गावर ती मनापासून प्रेम करायची. झाडा-वेलींच्या सहवासात राहायला तिला खूप आवडायचे. एक दिवस ती सकाळी बागेत फिरताना झाडा- वेलींशी गप्पा मारत होती. चालता चालता तिचे लक्ष झाडा-वेलींच्या पानांवरून टपकणाऱ्या दवबिंदूंकडे गेले. ती त्या दवबिंदूंकडे पाहत राहिली. पानांनी हालचाल केली, की त्यांच्यावरचे दवबिंदू घरंगळून खाली उड्या मारत होते. जमिनीत गडप होत होते. ते दृश्य पाहून तिला गंमत वाटली. किती तरी वेळ ती हा खेळ पाहत होती.

महाराज तिला पुन्हा पुन्हा टोकत होते. ‘राजकन्ये, तू आता विवाहयोग्य झालीस. एखादा पराक्रमी बुद्धिमान राजकुमार पाहून तुझा विवाह करून देऊ.’,

बागेतले दवबिंदू पाहता महाराजांचे बोलणे सिल्भा आठवले. या दवबिंदूंचा मुकुट कोणी बनवून दिला तर… तर त्य युवकाच्या राजकुमाराच्या, बुद्धिमत्तेची परीक्षा होईल. राजक न्या विचार करत होती. ठरले तर, असेच करू या. राजक न्या महालात परतली.

महाराजांबरोबर बोलून तिने आपला मनोदय व्यक्त केला. दवबिंदूंचा मुकुट कोणी माझ्या डोक्यात घालून देईल, त्याच्याशी मी लग्न करेन.’

‘बेटी, दवबिंदूंचा मुकुट कधी बनवता येईल का? अशक्यप्राय गोष्ट आहे ही.’ महाराज म्हणाले.

‘ते मला पण माहिती आहे. हा पण मांडला तर येणाऱ्या राजकुमाराची, त्याच्या बुद्धिमत्तेची परीक्षा होईल. जो कोणी या परीक्षेत उत्तीर्ण होईल, त्याच्याशी मी विवाह करेन.’ राजकन्येने आपला पण जाहीर केला- ‘जो कोणी युवक दवबिंदूंचा मुकुट बनवून माझ्या डोक्यात घालील, त्याच्याशी मी विवाह करेन.’

एक एक करत अनेक राजकुमार तिच्याशी लग्न करण्यासाठी आले. राजकन्येचा पण ऐकून परत गेले. दवबिंदू म्हणजे पाण्याचे रूप ! ते झाडाच्या पानांवरच छान दिसते. ते हातात कसे येणार? त्याचा मुकुट कसा आणि कोण बनवणार? ही अशक्यप्राय गोष्ट आहे, म्हणत ते परत गेले.

एक दिवस पवनपूरचा राजकुमार पवनकुमार आपल्या घोड्यावर बसून चंद्रनगरीत आला. त्याच्या चेहऱ्यावर एक आगळेवेगळे तेज होते. चेहरा हसतमुख होता. चंद्रसेन महाराजांच्या दरबारात आला. अभिवादन करत त्याने आपला परिचय करून दिला. आपल्या कन्येशी चंद्रकलेशी- विवाह करण्याचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. आपल्याला व राजकुमारीला मी योग्य वर वाटलो तर…’ बोलता बोलता तो थांबला. राजाकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागला.

Also Read : Story of The Tree of Money

‘राजकुमार, तुमच्या पराक्रमाच्या, बुद्धिमत्तेच्या कथा आम्ही ऐकल्या आहेत. अशा पराक्रमी, शक्तिसंपन्न, बुद्धिमान राजकुमाराला कोण नकार देईल. राजकन्या चंद्रकलेने मांडलेला पण तुम्हाला माहिती असेलच.’ राजा म्हणाला.

‘महाराज, राजक न्या चंद्रक लन विवाहयोग्य युवकांपुढे ठेवलेला पण माझ्यापण कानावर आला आहे. तो ऐकून मला आश्चर्य वाटले.’ पवनकुमार हसत हसत म्हणाला. ‘महाराज, राजकन्या चंद्रकलाला आपण दरबारात बोलवू शकाल का?’

‘आपल्या मनात काही विशिष्ट हेतू आहे का?’ राजाने विचारले.

‘ते राजकुमारीशी बोलून ठरवता येईल.’ पवनकुमार म्हणाला.

‘ठीक आहे राजकुमार. तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही राजकन्येला दरबारात बोलावतो.’ चंद्रसेन महाराज म्हणाले. त्यांनी राजकन्येला बोलवायला माणूस पाठवला..

राजकन्या चंद्रकला दरबारात आली. दोघांनी एकमेकांचा परिचय करून दिला. राजकुमार पवनकुमार म्हणाला, ‘राजकन्ये, मी राजकुमार असलो तरी हरहुन्नरी आहे. मी एक शिल्पकारपण आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे दवबिंदूंचा मुकुट मी सहजगत्या बनवू शकतो.’ आजपर्यंत आलेले राजकुमार दवबिंदूंचा मुकुट बनवणे अशक्यप्राय असल्याचे सांगत निघून गेले आणि हा राजकुमार दवबिंदूंचा मुकुट सहजगत्या बनवू शकतो, असे म्हणतोय. सगळा दरबार चकित नजरेने त्याच्याकडे लागला. पाहू प्रत्येक मंत्र्याच्या, राजकन्येच्या चेहऱ्यावर आश्चर्यच उमटले. राजकन्येकडे पाहत राजकुमार पवनकुमार म्हणाला, ‘दवबिंदूंचा मुकुट मी तयार करणार, तो तुम्हाला हवा तसा व्हायला हवा. तुमच्या इच्छेनुसार व्हायला हवा. त्यासाठी उद्या पहाटे आपण शाही उद्यानामध्ये यावे.’

‘हो हो. आम्ही उद्या पहाटे उद्यानात नक्की येऊ.’ राजकन्या हसत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित हसू फुटले होते. अशक्यप्राय गोष्ट कशी शक्य होणार, याची उत्सुकता भरून वाहत होती.

दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे महाराज चंद्रसेन, त्याचे मंत्रिगण आणि राजकन्या बागेत आले. राजकुमार पवनकुमार आधीच तेथे पोहोचला होता. त्याने सर्वांचे स्वागत केले. पहाटेचा गारवा सर्वांना जाणवत होता. राजकुमार पवनकुमार म्हणाला, ‘राजकन्ये, दवबिंदूंचा मुकुट तयार करण्यास मी सज्ज आहे. तो तयार करून मी तुमच्या डोक्यात नक्की घालीन.’ थोड थांबून तो पुढे म्हणाला, ‘माझीपण एक अट आहे. हे दिसणारे दवबिंदू एक एक करून तुम्ही तुमच्या सुंदर हातात घेऊन मला द्यायचे. ते दवबिंदू फुटता कामा नये, एवढे मात्र लक्षात असू द्या.’

झाडाच्या पानांवर दिसणारे ते दवबिंदू हळुवारपणे हातात घ्या आणि माझ्याकडे द्या.’ पवनकुमारने आपला हात पुढे केला. •

राजकुमार पवनकुमारचे बोलणे ऐकून राजकन्या चंद्रकला विचारात पडली. मोठ्या धर्मसंकटात सापडली.

‘राजकन्ये, कसला विचार करताय. सूर्योदय उहायला थोडा वेळ उरलाय. त्यापूर्वीच आपल्याला – आपले काम पूर्ण करायचे आहे. सूर्योदयाबरोबर ते दवबिंदू निघून जातील. चला आटपा लवकर.’ राजकुमार पवनकुमार म्हणाला.

राजकन्या चंद्रकला झाडावरच्या पानांवर असलेले दवबिंदू हातात घेऊ लागली; पण ते हातात न येता घरंगळून खाली पडले. त्याचे पाणी झाले.

‘राजकन्ये, त्वरा करा. पटापटा ते दवबिंदू माझ्या हातात द्या. ते माझ्या हातात आल्याशिवाय मी मुकुट बनवू शकत नाही.’ राजकुमार पवनकुमार हसत हसत म्हणाला.

‘मी खूप प्रयत्न करतेय; पण ते दवबिंदू हातात न येता घरंगळून खाली पडताहेत. मी ते तुम्हाला देऊ शकत नाही.’ राजकन्या चंद्रकला खाली मान घालून म्हणाली.

तुम्हीच विचार करा. दवबिंदू मिळाले नाही, तर मग दवबिंदूंचा मुकुट बनवता येणार नाही.’ राजकुमार पवनकुमार म्हणाला.

राजकन्येने लजेने मान खाली घातली. म्हणाली, ‘पिताजी, मला हवा तसा बुद्धिमान जीवनसाथी मिळाला आहे.’

‘त्याने तुझा पण पूर्ण केलेला नाही. तो हरला. मग तुला तुझा जीवनसाथी कसा मिळाला?’ राजाने प्रश्न केला.

‘पिताजी, दवबिंदूंचा मुकुट बनवण्याचा पण मी ठेवला; पण या राजकुमाराने मला दवबिंदू गोळा करून देण्याची अट घातली. ती मी पूर्ण करू शकले नाही. तो जिंकला मी हरले हे खरे असले, तरी मला माझ्या मनासारखा बुद्धिमान युवक, जीवनसाथी म्हणून मिळाला आहे.’

जमलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून दोघांचे अभिनंदन केले. यथासमयी राजाने राजकन्या चंद्रकलेचा पवनकुमार बरोबर विवाह लावून दिला.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.