Story of A Child's feet are seen in Cradle

Story of A Child’s feet are seen in Cradle in Marathi

1 min read

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात गोष्ट मराठीत.

Story of A Child’s feet are seen in Cradle : युगोस्लाविया नावाचा देश, जो जगाच्या नकाशात फारसा ठळक नसलेला. अशा या देशातले स्कोपजे नावाचे एक छोटेसे खेडे होते. तिथे २० ते २५ हजार एवढीच लोकसंख्या होती. देशांर्गत लढायांनी, वारंवार होणाऱ्या भूकंपांनी नेहमी अशांती असे. त्यात दुसऱ्या महायुध्दामुळे देशातले वातावरण अगदी गढूळ होऊन गेले होते. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे पूर्व-पश्चिम संस्कृतीचे छान मिश्रण झाले होते. या गावात टर्कीश, ग्रीक, जिप्सी आणि स्लाव्ह वंशाचे लोक गुण्यागोविंदाने राहात होते. त्यामुळे मशिदी व चर्च जवळजवळ होते.

Story of A Child’s feet are seen in Cradle

गाव तसे खाऊन पिऊन सुखी होते. हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या या गावात सकस चारा खाऊन मेंढ्या अगदी गरगरीत झाल्या होत्या. अशा या संपन्न गावात कॅथलिक कुटुंबात २७ ऑगस्ट १९१० ला ज्यांना सारं जग ‘मदर तेरेसा’ म्हणून ओळखतो त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव अतिशय अवघड – गोक्झा बोजाक्झिऊ होतं. गोक्झाचे वडील बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते. गावात त्यांची चांगली नामांकित कंपनी होती. स्कोपजे गावात पहिलं थिएटर बोजाक्झिऊनीच बांधले. वडील हुशार होते, श्रीमंत होते, त्याचबरोबर दानशूर होते. त्यांना गरिबांबद्दल कळवळा होता. हे गरिबांवरचे प्रेम बघतच गोक्झा लहानाची मोठी झाली. तिला घरी अॅग्नेस म्हणत. अॅग्नेसच्या वडिलांना अल्बानियन भावखेरीज अनेक भाषा अवगत होत्या.

आईचं नाव डूनाफाईल बर्नाई होतं. आई-वडील दोघेही धार्मिक असल्याने घरात धार्मिक वातावरण होतं. अॅग्नेसच्या मोठ्या भावाचं नाव लाझार व वहिणीचं नाव अॅगा होतं. ऐसपैस घर होतं. या भावंडांचं जमायचंही छान. तीनही भावंडांवर आपल्या सात्विक आईचा पगडा होता. देवावर तिची अपार श्रध्दा होती. आईनं या मुलांना फक्त देवावर नव्हे तर शेजाऱ्यावरही प्रेम करायला शिकवलं. आई कमालीची तत्त्वनिष्ठ असल्याने तिने मुलांवर उत्तम संस्कार केले. ही पुले आईला ‘नानालोके’ म्हणत. नानाचा अर्थ आई तर लोके म्हणजे आत्मा. तिनं खरोखरच या तिन्ही मुलांचे आत्मे सुसंस्कृत घडवले. आईला काहीही वाया घालवलेलं आवडत नसे. वीज, पाण्याचा वापर त्यामुळेच अॅग्नेसने पुढे आपल्या संस्थातून त्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केला. आईप्रमाणेच अॅग्नेस देवावर अपार श्रध्दा ठेवून अॅग्नेसची ‘मदर’ झाली.

अॅग्नेस व तिच्या भावंडांचे शिक्षण बिगर कॅथलिक शाळेत झाले. शाळेत चांगले धर्मोपदेशक त्यांना भेटले. अॅग्नेसला पुस्तक वाचायला खूप आवडे. ती जास्तीत जास्त वेळ लायब्ररीत वाचत बसे. अशा या आनंदी कुटुंबावर वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने दुःखाची कुऱ्हाड कोसळली. वडील वारले तेव्हा अॅग्नेस फक्त सात वर्षाची होती. आईला तर हा काळाचा क्रूर घाला सोसवलाच नाही. या दुःखातून बाहेर यायला तिला वेळ लागला. या तीन भावंडांना मोठं कसं करायचं हा अवघड प्रश्न तिला छळू लागला.

also read : Story of Surya and Enginekaka in Marathi

अॅग्नेसच्या वडिलांच्या कंपनीतला त्यांचा मित्र असलेला सहकारी लबाड निघाला. त्याने सगळा पैसा स्वतःकडे ठेवून या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले. राहत्या घराखेरीज कोणताच आधार या कुटुंबाकडे राहिला नाही. दुःखातून बाहेर येऊन आईने छोटा व्यवसाय सुरू केला. या कुटुंबाला प्रथमच आर्थिक ओढाताणीचे फटके सोसावे लागले. अॅग्नेसला प्रथमच दुःखाची ओळख झाली.

अॅग्नेस बारा वर्षाची झाली. तिने आईबरोबर धर्मग्राममध्ये सामाजिक कामाचा श्रीगणेशा गिरवायला सुरुवात केली. या छोट्या मुलीला ‘नन’ व्हावं असं वाटू लागलं. नन होणं सोपं नव्हतं. बालपण विसरून स्वतःला सेवाकार्यात गुंतवायचं म्हणजे खूप मोठी तपस्या होती. ननच्या रूपातून परमेश्वर आपले सेवेचं कार्य पुढं नेत असतो. अॅग्नेसला जणू काही नन होण्याचा संदेश प्रत्यक्ष ईश्वराकडूनच आला होता. तिनं आईजवळ आपली इच्छा व्यक्त केली. आईला एवढ्या लहानपणी अॅग्नेसने नन होण्याचे स्वप्न पहावं हे काही रुचले नाही. तिनं तिला यापासून परावृत्त व्हावे म्हणून विरोधही केला. काही दिवस शांततेत गेले. यानंतर अॅग्नेस फादर जॅम्ब्रेन कॉविक यांच्या सहवासात आली. ते संतांच्या आणि मिशनरी लोकांच्या कहाण्या ऐकत. या कहाण्यातून अॅग्नेसला काही जेसुईट्स मिशनरी म्हणून भारतातल्या बंगाल प्रांतात गेल्याचे कळले.

त्या मिशनऱ्यांच्या अनुभवातून अॅग्नेसला भारतात जावेसे वाटू लागले. बंगालमध्ये नर्सचा एक ग्रुप मुलांना शिकवण्याचे काम करतो हे ऐकून तिलाही तीव्रतेने हे काम करण्याची इच्छा झाली. तिच्या आशा पल्लवित झाल्या. तिचा मोठा भाऊ लष्करात गेला होता. तो नोकरीमुळे कुटुंबापासून दूर होता, अग्नेसने जेव्हा त्याला पत्रानं आपली नन होण्याची इच्छा कळविली तेव्हा त्याला आपल्या नाजूक अशा या छोट्या बहिणीचा निर्णय ऐकून धक्काच बसला. त्यानं तत्काळ बहिणीला पत्र लिहिलं, ‘तुझ्यासारखी नाजूक मुलगी नन होणार? तू आनंदी, हसतमुख, चैतन्यमूर्ती आहेस. तू अशा निर्णयामुळे स्वतःला संपवणार आहेस, असं करू नकोस.’ अॅग्नेसचा निर्णय पक्का होता.

१९२८ साल उजाडलं ते मुळी अॅग्नेसला नन हो असा दैवी संदेश देणारे. निर्णय जसा महत्वाचा होता तसा खूप अवघड होता. प्रिय आई, बहीण, घर, गाव सगळं सोडून, हा मायेचा बंध तोडून दूरदेशी जायचं होतं. सुरक्षित जगाचा त्याग करून नव्या जगात सेवावृत्तीनं, निरलसपणे गरिबांची सेवा करायची होती. अठरा वर्षाची ही गोक्झा ‘अॅग्नेस’ सिस्टर होण्यासाठी ठाम निर्धारानं, मोठ्या धाडसाने उभी राहिली.

also read : Story of Surya and Enginekaka in Marathi

ती फादर जॅम्ब्रेनकॉविकना भेटली. तिनं स्पष्ट शब्दात तिला आलेला देवाचा निरोप, बोलावणं सांगितलं. फादरनी तिला सर्वस्व द्यायचे असेल, त्यागाची तयारी असेल तर जा.’ असं सांगितलं.

चर्चच्या बाहेर बसून त्या धाडसी तरुणीनं आपला संकल्प पूर्ण करायचा निश्चय केला. घर सोडायचा निश्चय आता आईला सांगायचा होता. ही तिच्या दृष्टीनं मोठी परीक्षा होती. अविचलित न होता तिनं आपला निर्णय सांगितला. आई हे ऐकून अक्षरशः मोडून पडली. त्या परक्या देशात आपल्या या वयात आलेल्या पोरीचं कसं होणार या काळजीनं तिच्या पोटात खड्डाच पडला. मातृहृदयाला काळजी वाटणारचं. तिनं स्वतःला खोलीत २४ तास बंद करून घेतलं. शेवटी मन घट्ट करून तिनं आपल्या लाडक्या लेकीला होकार दिला.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

आमच्या विषयी

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.