Story of Timeplease

Story of Timeplease in Marathi : टाइमप्लीज गोष्ट.

1 min read

Story of Timeplease : रविवार होता. बाबांनी रॉजरला बाहेर न्यायचं कबूल केलं होतं, तरी ते कामावर गेलेले होते. रॉजर बाबांना शोधत त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. आज रविवार असल्यामुळे माणसं कमी होती; त्यामुळे रॉजरला त्याचे बाबा लगेचच सापडले. ते मल्टिव्हॅक या महासंगणकावर काम करत होते. ते काम करणारे सर्वचजण मल्टिव्हॅकच्या परिसरातच राहत होते. त्यांची ती वसाहत फार महत्त्वाची होती. कारण तिथले सर्वजण मल्टिव्हॅकच्या मदतीने पृथ्वीवरच्या सर्वांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते.

बाबांनी कामातून मान वर काढली, तर त्यांना रॉजर दिसला. त्यांनी परत वायरींच्या भेंडोळ्यात डोकं खुपसलं. तिथे उभे असलेले आणखी एक जण त्यांना म्हणाले, “अॅटकिन्स, थोडावेळ सुट्टी घे. जवळजवळ नऊ तास तू काम करतोयस. किती कंटाळलायस. पोराला घेऊन कँटीनमध्ये जा. मग थोडी झोप काढून परत ये.”

काहीशा नाइलाजानेच रॉजरचे बाबा हातातलं काम सोडून निघाले. “चल, रॉजर, कैटिनमध्ये पहिल्यांदा पोचेल त्याने हँबर्गरचे पैसे द्यायचे!”

रॉजर पळत सुटला. कँटीनच्या दाराशी थबकला. बाबांच्या पैजेतली खोच त्याच्या लक्षात आली. मग तो बाबांसाठी थांबला. हात स्वच्छ धुऊन दोघंही कैटिनमध्ये एकदमच शिरले.

also read : Story of Yanku in Marathi

हँबर्गर खाता खाता रॉजरने विचारलं, “बाबा, मल्टिव्हेंक अजून दुरुस्त झाला नाही?”

रॉजरचे बाबा थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, “हो ना, काहीच कळत नाहीये.”

“पण मी आलो तेव्हा तर तिथे दिव्यांची उघडझाप चालू होती. स्क्रीनवर अक्षरं उमटत होती.” रॉजर म्हणाला.

“म्हणजे तो काम करतोय, रे! पण मधूनच तो चुकीची उत्तरं देतोय.”

रॉजर तेरा वर्षांचा होता. चौथीपासून तो कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकत होता. त्यातलं सगळंच त्याला आवडत होतं असं नाही. त्याचे बाबा मल्टिव्हॅकवर काम करत होते त्याचा त्याला फायदाही होत असे. “मधूनच चुकीची उत्तरं देतो, म्हणजे?” त्याने विचारलं. “कारण खरी उत्तरं तर त्यालाच माहीत असणार ना? मग हे बरोबर, हे चूक, असं तुम्ही ठरवालच कसं?”

रॉजरचा प्रश्न ऐकून त्याचे बाबा जरा वेळ विचारात पडले. मग म्हणाले, “मल्टिव्हॅककडे सर्वश्रेष्ठ यांत्रिक मेंदू आहे हे बरोबर आहे, पण…” आपल्या डोक्यावर बोट आपटत ते पुढे म्हणाले, “या इथे जे महान यंत्र बसवलंय त्याच्या तुलनेत तो काहीच नाही. मानवी मेंदूला जे उत्तर शोधायला हजारो वर्ष लागतील ते मल्टिव्हॅक काही सेकंदांत काढतो, पण त्याचबरोबर ‘ते उत्तर चूक असावं’ हे या मेंदूला एका क्षणात जाणवतं. मग आम्ही मल्टिव्हॅकला तोच प्रश्न परत विचारतो. दुसऱ्या वेळी मल्टिव्हॅक मग वेगळंच उत्तर देतो. जेव्हा मल्टिव्हॅक अशी वेगवेगळी उत्तरं देतो तेव्हा त्यातलं एकच उत्तर बरोबर असतं, नाही का? शिवाय, आम्ही दरवेळी मल्टिव्हॅकच्या चुका शोधत बसलो तर पंचाईतच । प्रत्येक उत्तर बरोबर आहे हे कसं काय धरून चालणार? असा सगळा गोंधळ आहे. मल्टिव्हॅकमध्ये काही तरी बिघाड आहे. तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. तो बिघाड काय आहे ते शोधायचा आम्ही प्रयत्न करतोय.”

also read : Story of Yanku in Marathi

“बिघाड वाढत का चाललाय?” रॉजरने विचारलं. त्याच्या बाबांनी आपला हँबर्गर संपवला होता. ते आता केक खात होते. “रॉजर, मला वाटतं, आम्ही त्याला चुकीची हुशारी शिकवलीय.”

“म्हणजे?”

“हे बघ, मल्टिव्हॅक जर माणसाइतका हुशार असता तर त्याच्याशी चर्चा करून त्याच्यात काय बिघाड झालाय हे शोधून काढता आलं असतं. जर तो अजिबात हुशार नसता तर मग ती चूक सरळच आमच्या लक्षात आली असती. पण तो अर्धवट हुशार आहे. एखाद्या अर्धवट माणसासारखा वागतोय तो. मुद्दाम चूक करून गोंधळ उडवतोय. पण ती चूक दुरुस्त करायची हुशारी मात्र त्याच्यात नाही. यालाच मी चुकीची हुशारी म्हणतो.” रॉजरच्या बाबांचा आवाज पडला होता. “पण त्याला आणखी चलाख बनवणंही आमच्या हाती नाही. बरं, त्याला अगदी मठ्ठ बनवलं तर त्याचं ठरलेलं काम तो कसं करणार?”

“बाबा, मग तुम्ही मल्टिव्हॅक थोडा वेळ बंद ठेवून मग त्याची तपासणी का करत नाही?”

“ते तर शक्यच नाही. तो दिवसरात्र सतत चालू रहायला हवा, तरी बरीच कामं उरतात. त्याला बंद कसं ठेवणार?”

“पण बाबा, मल्टिव्हेंक अशाच चुका करत राहिला तर एक ना एक दिवस तो बंद करणं भागच पडेल.” रॉजरने कॉफीचा कप तोंडाला लावत विचारलं.

“अरे, लवकरच तो नीट काम करायला लागेल. काळजी करू नकोस. चल, कॉफी संपव. आपण द जाऊ या.”

पण रॉजर म्हणाला, “बाबा, माझं ऐकून तर घ्या.. तुम्ही मल्टिव्हॅकला अर्धवट का म्हणताय?”

“त्याला ज्याप्रकारे प्रोग्राम करावं लागतं ते तू बधिन्ते असतंस तर तू हा प्रश्न विचारला नसतास.”

“तसं तुम्हाला वाटतंय, बाबा! मी तरी तुमच्याएवढा हुशार कुठे आहे? पण म्हणून मला तुम्ही अर्धवट थोडंच म्हणता? मल्टिव्हॅकही अर्धवट नव्हे, तर लहान मुलासारखा आहे असं नाही तुम्हाला वाटत?”

हा मुद्दा रॉजरच्या बाबांना पटला. तरी त्यांनी विचारलं, “पण त्याने काय फरक पडणार?”

“खूप फरक पडेल, बाबा. तुम्ही कोणी अर्धवट नाही, त्यामुळे अर्धवट माणसं कसा विचार करतात हे तुम्हाला कसं कळणार? पण मी लहान आहे, यामुळे आम्ही मुलं कसा विचार करतो हे मला नक्की ठाऊक आहे.”

also read : Story of Yanku in Marathi

“ठीक आहे, मुलं काय करतात ते सांग बघू.”

“तुम्हीच म्हणालात, मल्टिव्हॅकला दिवस-रात्र काम करायला लागतं. माझ्यासारख्याला तुम्ही सतत अभ्यास करायला लावलंत तर काही काळाने मला कंटाळा येईल. वैतागून मी कदाचित मुद्दामही चुका करीन. मला असं वाटतं, दिवसातले तास दोन तास तुम्ही मल्टिव्हॅकला सुटी द्या. कोणतंही काम सांगू नका. त्याचं त्याला काय करायचं ते करू द्या. मग बघा!”

हे ऐकून रॉजरचे वडील विचारात पडले. जरावेळाने म्हणाले, “तू म्हणतोस ते अगदीच चुकीचंही नाहीये. मल्टिव्हॅक दिवसातले बावीस तास चांगलं काम करणार असेल तरी ते आम्हाला चालेल. कारण ते काम नक्की चांगलं असेल.” मग त्यांनी कॉफी संपवली, रॉजरकडे बघितलं आणि विचारलं, “रॉजर, हे असंच घडेल ना? वागेल ना तो नीट ?”

“नक्की नीट वागेल तो, बाबा! कुठल्याही पोराला खेळायला आवडतंच.”

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.